मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !

प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.

बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निवाडा !

बंगालमध्ये २५ सहस्रांहून अधिक शिक्षक आणि अन्य पदे यांच्या भरतीचा घोटाळा करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने या घोटाळ्याशी संबंधित २५ सहस्र ७५३ शिक्षकांची भरती रहित केली.

उतावीळ काँग्रेस

‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.

नवा पाकिस्तान : राजकारण, आतंकवाद आणि युद्ध

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रसिद्ध वक्तव्य, म्हणजे ‘तुम्ही तुमचे मित्र पालटू शकता; पण तुम्ही तुमचे शेजारी पालटू शकत नाही.’ या उक्तीनुसार आपल्या अवतीभवती घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा चांगला आणि वाईट परिणाम सभोवतालच्या देशांवर होत असतो.

जग तिसर्‍या स्फोटाच्या उंबरठ्यावर !

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय – कृत्रिम बुद्धीमत्ता) काय करू शकते ? याची चुणूक जगाला दिसू लागली आहे. या  तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ (प्रणेते) म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे ? ते विनाशक का होऊ शकते ? याविषयी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी मी जे काम केले,  त्याविषयी मला थोडा खेदच वाटतो’, हे … Read more

हिंदु धर्मातील सर्व घटक एकत्र बांधून ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल ?

समाजातील विविध घटक जे विभिन्न स्वभाव- प्रकृती-क्षमता यानुरूप असतात, त्यांना सुसंवादी पद्धतीने आणि परस्परांमध्ये संघर्ष होऊ न देता एकत्र नांदवण्यासाठी हिंदु धर्माची व्यवस्था निर्माण झाली.

इंग्रज प्रवासी विल्यम फिंचच्या आठवणीतील श्रीराममंदिर !

विल्यम फिंच याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत.

शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य !

आपल्या शरिरात ३ प्रकारचे मल असतात, पुरिष (शौचावाटे बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ), मूत्र (लघवी) आणि घाम. या ३ मलांपैकी मूत्र हे मूत्रपिंडामध्ये तयार होते. आज आपण आपल्या शरिरातील मूत्रपिंडाचे कार्य कसे चालते ? ते समजून घेणार आहोत.

दुबईमध्ये आलेला पूर : निसर्गाची आणखी एक चेतावणी !

आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.

मैदानाबाहेर ‘आय.पी.एल्.’चे ‘गेमिंग ॲप’ जोमात; पण बंदीची अपेक्षा !

‘ड्रिम इलेव्हन’सारख्या ॲपमधून करोडपती झालेल्यांची माहिती दिली जाते; मात्र ‘किती जण कंगाल झाले ?’, याची माहिती कुठेच दिली जात नाही. ज्या ‘गेम’मुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत, त्याकडे सरकार दुर्दैवाने केवळ अधिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून पहात आहे.