विधानसभा निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार ! – केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त

ईव्हीएम् यंत्राद्वारे निवडणूक घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होईल. ईव्हीएम् यंत्र दोषमुक्त आहे.

देहली विश्‍वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍या अक्षय लाकडा याला अटक करण्याची मागणी करणारे निवेदन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विटंबना करणार्‍यांवर सरकार कठोरातील कठोर कारवाई करील का ?

आतंकवाद्यांना होणार्‍या अर्थपुरवठ्याची चौकशी करतांना लाच घेतल्याच्या प्रकरणी एन्आयएचे ३ अधिकारी निलंबित

आतंकवादाच्या संदर्भात लाचखोरी करणार्‍या अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल (जळगाव) येथे तहसीलदारांना निवेदन !

यावल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार आर्.के. पवार यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले.

पुरी (ओडिशा) येथील प्राचीन मठ-मंदिरे पाडण्याचा ओडिशा सरकारचा हिंदुद्वेषी निर्णय रहित करण्याच्या मागणीचे निवेदन !

मठ-मंदिरे पाडणार्‍या रझाकारी वृत्तीच्या ओडिशा सरकारचा भारतभरातील हिंदूंनी वैध मार्गाने निषेध करणे अपेक्षित !

आधीच कारवाई न करणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांना बडतर्फ करा !

नागपूर महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव  जागांवर अवैधपणे बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवरील कारवाई आता पूर्ण झाली आहे; परंतु अद्यापही राज्य सरकार, नागपूर विद्यापीठ, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे आणि इतर विभाग यांच्या भूमीवरील धार्मिक अतिक्रमण कायम आहे,

पुष्कळ पाणीटंचाईमुळे लातूरमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता मूर्ती दान करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

दुष्काळग्रस्त भागात मूर्तीविसर्जन करण्याचे पर्याय ! हिंदूंना धर्माचरणाच्या कृती करता याव्यात, यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. हिंदूंनी वैध मार्गाने प्रशासनास यासाठी भाग पाडावे !

शहर अभियंता विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे नवी मुंबईत खड्ड्यांचे साम्राज्य ! – महापालिकेत आरोप

शहर अभियंता विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे, असा आरोप स्थायी समितीच्या सदस्यांनी ९ सप्टेंबर या दिवशी येथील महापालिकेच्या बैठकीत केला.

गांधीवादामुळेच देशाची हानी झाली ! – निवृत्त मेजर जनरल गगनदीप बक्षी

गेली ७२ वर्षे गांधीवादाचा उदोउदो केल्याने देशाची हानी झाली आहे. शक्तीशाली देश ऐकून घेत नाहीत. आतापर्यंत पुष्कळ सहन करीत आलो, असे   प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल गगनदीप बक्षी यांनी ५ सप्टेंबर या दिवशी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राशी बोलतांना केले.

पनवेल भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर भूमापक कह्यात

भूमीची मोजणी करून आकारफोड करण्यासाठी ८० सहस्र रुपयांची लाच घेणारा पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर भूमापक महादेव भावसिंग जाधव (वय ४९ वर्षे) याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे.


Multi Language |Offline reading | PDF