राजधानी देहलीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?

ब्रिटीश ‘स्नायपर’च्या ९०० मीटरवरून झाडलेल्या एका गोळीद्वारे इस्लामिक स्टेटचे ५ आतंकवादी ठार !

जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.

क्रूर मौलवीच्या अनंत यातना सोसून प्राणत्याग करणारी; मात्र इस्लाम न स्वीकारणारी तमिळनाडूतील ८ वर्षीय धर्मप्रेमी हिंदु बालिका वैदेही !

बंधक बनवलेल्या हिंदु कुटुंबातील ८ वर्षांची वैदेही कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारण्यास सिद्ध नव्हती. तिने सांगितले, मरण पत्करीन; पण कलमा वाचणार नाही.

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

हिंदु नाव धारण करून हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ?

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.१.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात

चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत.

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

हिंदूंना गतवैभव मिळावे !

विदिशा, धार आणि एरंडोल यांसारख्या अनेक वास्तू धर्मांधांच्या तावडीतून सोडवायला हव्यात. ‘धर्मांधांच्या कह्यातील हिंदूंच्या सर्वच वास्तू आणि मंदिरे यांची मुक्ती होऊ दे. त्यांची पुनर्स्थापना लवकरात लवकर होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळू दे आणि भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होऊ दे, अशी धर्मनिष्ठ हिंदूंची आर्त प्रार्थना !