नवी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलीस यांची अनधिकृत पार्किंग अन् गॅरेज येथे धडक कारवाई !

‘वाशी – तुर्भे लिंक मार्गावर अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजवाले यांचा उपद्रव’ या मथळ्याअंतर्गत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची नोंद घेत वरील कारवाई करण्यात आली.

एन्.एम्.एम्.टी.च्या महिलांसाठीच्या बसगाड्या बंद !

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीने (एन्.एम्.एम्.टी.) महिलांसाठीची तेजस्विनी बससुविधा वर्षभरापासून बंद पडली आहे.  ही बस सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी महिला करत आहेत.

नेरूळ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हा नोंद !

नेरूळ रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू येथील पदपथावर आणि रस्त्यावर बसणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरुद्ध नेरूळ विभाग कार्यालयाच्या माध्यमातून धडक मोहीम घेण्यात आली होती.

१० फेब्रुवारीपासून नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन !

प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने वरील कटू निर्णय आम्हाला घेण्यास प्रशासनाने भाग पाडले आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी व्यक्त केली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भंगार गोदामांना आग; नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी संपावर जाणार…

कुर्ला येथे २ ते ३ भंगार गोदामांना आग लागली. अग्‍नीशामक दलाच्‍या ४ गाड्या घटनास्‍थळी आल्‍या. बीकेसी भागात गॅस सिलेंडरचा स्‍फोट झाल्‍याने ही आग लागली.

नवी मुंबई महापालिकेच्या नावे बेकायदेशीरपणे पार्किंगची वसुली करणार्‍यावर खंडणीचा गुन्हा नोंद !

अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार ! – गणेश नाईक, वनमंत्री

गणेश नाईक म्हणाले की, विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचेच नाव लागणार, हा विश्वास आहे; कारण नामकरण चळवळ सर्वांनीच मनावर घेतली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकाच्या भागात पोलिसांनी धाड घालून वेश्या व्यवसाय करणार्‍या १३ महिलांसह त्यांच्या ४ प्रमुखांना अटक केली. महिलांची रवानगी उल्हासनगर येथील सुधारगृहात करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स यांवर धडक कारवाई होणार !

शहरातील अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स यांवर धडक कारवाई करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे त्‍या संदर्भात नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. राहुल गेठे यांनी केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा वर्धापनदिन समारंभ ७ जानेवारीला ! – सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त

नवी मुंबई महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिन समारंभ १ जानेवारी ऐवजी ७ जानेवारी या दिवशी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.