पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !
‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्यांनी. या गावात देवळे होती. येथील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते.