अधिकाधिक लाभापायी औषध विक्रीद्वारे जनतेला लुटणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची खासदारांकडे मागणी

औषधांच्या विक्रीतून अधिक नफा मिळवून लोकांची प्रचंड लूट करण्यात येत आहे. असे करणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’कडून येथे काही खासदारांना देण्यात आले. तसेच ‘हा विषय संसदेत उपस्थित करावा’, अशी विनंतीही या खासदारांना करण्यात आली.

संतश्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथे राज्यव्यापी १५ वे वारकरी महाअधिवेशन

‘धर्माचे पालन करणे, पाखंड खंडण ।’ या संतवचनाप्रमाणे धर्मरक्षण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले १५ वे राज्यव्यापी वारकरी महाअधिवेशन येथे धर्ममय वातावरणात पार पडले.