पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रसंमत नसलेले रासायनिक लेपन करण्यात येऊ नये !
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.