मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील वाहतूक शाखेच्या लाचखोर पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा नोंद

कारवाई करतांना जप्त केलेल्या टेंपोवर दंडाची पावती न बनवण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेणारा मुंब्रा येथील वाहतूक विभागाचा शिपाई अंगद मुरलीधर मुंढे (वय ३१ वर्षे) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे.

पोलीस आणि प्रशासन यांच्या असंवेदनशीलतेचा कहर !

‘देवगड (सिंधुदुर्ग) आगाराची खुडी-देवगड ही एस्.टी. बस देवगड येथे येत असतांना तालुक्यातील बौद्धवाडी, दाभोळे येथे प्रभावती कृष्णा जाधव (वय ७०  वर्षे) या महिलेला गाडीची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला.

मंदसौर (मध्यप्रदेश) येथे स्वतःला पेटवून घेतलेल्या महिलेला न वाचवल्यामुळे तिचा मृत्यू !

पराकोटीचे असंवेदनशील पोलीस !
अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

अनेक वर्षे झोपल्यानंतर जागे झालेले पोलीस !

वाहतूक पोलिसांनी शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणार्‍या ४३, तर सीट बेल्ट न लावता वाहन चालवणार्‍या १२ पोलीस वाहनचालकांविरुद्ध दंडाची कारवाई केली.

अंमलदाराने गैरमार्गाने २२ लाखांची संपत्ती गोळा केल्याचे उघड

पोलीस अंमलदाराने गैरमार्गाने १९ वर्षांत २२ लाखांची संपत्ती जमा केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या अंमलदारासह त्याच्या पत्नीवर गुन्हा नोंद केला आहे. रमेश आवटे (वय ४० वर्षे) असे या आरोपी अंमलदाराचे नाव आहे.

विवाहाचे आमीष दाखवून फसवणार्‍या दोन नायजेरीयन तरुणांना अटक

गुन्हेगारीतील नायजेरीयन तरुणांचा वाढता समावेश वेळीच रोखण्यासाठी त्यांना भारतातूनच हाकलून द्यायला हवे !


Multi Language |Offline reading | PDF