वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी नवीन याचिका करता येणार नाही

रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल रामललाच्या बाजूने लागला असला, तरी ‘प्लेसेस ऑफ वरशिप’ (विशेष तरतूद) या कायद्यामुळे देशातील अन्य वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी नवीन याचिका प्रविष्ट करता येणार नाही. यामुळे काशी आणि मथुरा या मंदिरांचा प्रश्‍न निकाली काढण्यात अडचणीचे ठरणार आहे.

वायूप्रदूषणामुळे वाराणसी येथील मंदिरांतील देवतांच्या मूर्तींच्या नाकावर कापड बांधले

सध्या देशाची राजधानी देहलीसह उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये वायूप्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढलेला आहे. यामुळे नागरिकांकडून नाकावर कापड बांधण्यात येत असतांनाच वाराणसी येथे मंदिरांतील देवतांच्या मूर्तींच्या नाकावरही कापड बांधण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

पाकमधील हिंदूंचे न्याय्य अधिकार आणि हिंदूंची मंदिरे यांचे होणारे हनन जाणा !

आज पाकिस्तानात असलेले पेशावर एकेकाळी हिंदु संस्कृतीचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तिथे अनेक मंदिरे असणे, यात आश्‍चर्य नाही. पेशावरमधील एक प्राचीन तीर्थक्षेत्र ‘गोरखटडी’ हे पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. फाळणीनंतर मात्र ही प्राचीन मंदिरे जवळपास बंदच करण्यात आली. गेल्या काही मासांपासून वर्षांनुवर्षे बंद असलेली ही मंदिरे पाकिस्तानकडून उघडण्यात येत आहे.

हुलजंती (जिल्हा सोलापूर) गावातील मंदिराच्या दानपेटीतील रकमेची चोरी

तालुक्यातील हुलजंती गावातील महालिंगराया मंदिराच्या साहित्य ठेवण्याच्या बंद खोलीतील (स्टोअर रूम) दानपेटी फोडून त्यातील ४० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली आहे.