जत (जिल्‍हा सांगली) तालुक्‍यातील गुड्डापूर येथील श्री दानम्‍मादेवी मंदिर पाडण्‍यास पुरातत्‍व विभागाची मनाई !

श्री दानम्‍मादेवीचे मंदिर हे पुरातन आहे. पुरातन मंदिरात नवीन बांधकाम करता येत नाही, याची माहिती विश्‍वस्‍तांना असतांनाही त्‍यांनी मंदिरातील बांधकाम पाडून तेथे नवीन बांधकाम चालूच कसे केले ?

राहुल गांधी यांना २ डिसेंबरला न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी अवमानकारक वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुणे येथील विशेष न्‍यायालयात १८ नोव्‍हेंबरला उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावण्‍यात आले होते;…

रुग्‍ण मतदारांसाठी विनामूल्‍य रुग्‍णवाहिका सेवा !

मतदानापासून कुणी वंचित राहू नये, यासाठी मंचच्‍या वतीने मतदारांना त्‍यांचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य बजावण्‍यासाठी सामाजिक बांधिलकी म्‍हणून विनामूल्‍य रुग्‍णवाहिका सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती. 

मुंबई, ठाणे, विदर्भ यांसह पश्‍चिम महाराष्‍ट्रातील मतदानाविषयीच्‍या घडामोडी !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात अत्‍यंत चुरशीने मतदान झाले. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील १० मतदारसंघांत सायंकाळी ५ पर्यंत ६७.९७ टक्‍के मतदान झाले होते. कागल मतदारसंघात सर्वाधिक म्‍हणजे ७४.३३ टक्‍के, तर शाहूवाडी मतदारसंघात ७०.४० टक्‍के मतदान झाले.

निष्‍क्रिय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी न्‍यायालयाने जामीन नाकारल्‍याने ज्ञानेश महाराव याला तात्‍काळ अटक करा ! – प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोट

नवी मुंबई येथील विष्‍णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेड या संघटनेच्‍या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव याने सार्वजनिक मंचावर देवतांविषयी अकारण अपकीर्ती करणारी आणि अपमानास्‍पद विधाने केली होती.

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत घोटाळा झालेल्‍या ‘बिटकॉईन’मधील पैसा वापरला !

खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्‍याचे पैसे वापरले. ही रक्‍कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.

महायुती अधिक जागांवर विजयी होण्‍याचे संकेत

चाणक्‍य स्‍ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत महायुतीला १५२ ते १६० जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे, तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर विजय मिळेल. भाजप राज्‍यातील सर्वांत मोठा पक्ष ठरण्‍याची शक्‍यता आहे.

Maharashtra Elections 2024 : महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी ५ वाजेपर्यंत ६५.११ टक्‍के मतदान !

राज्‍यात कायदा आणि सुव्‍यवस्‍थेविषयी कोणताही गंभीर प्रश्‍न उद़्‍भवला नसला, तरी काही अनुचित घटना घडल्‍या. यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.

४ राज्‍यांतील १५ विधानसभा आणि लोकसभेच्‍या एका जागेवर मतदान !

महाराष्‍ट्र आणि झारखंड राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुका होत असतांना ४ राज्‍यांतील १५ विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.