कोल्हापूर – करवीर तालुक्यातील केले गावात कुमार हायस्कूलमध्ये कु. स्वरूप माने (वय ११ वर्षे) हा सहावी इयत्तेत शिकत होता. तो लघुशंकेसाठी जात असतांना शाळेचे लोखंडी गेट त्याच शाळेतील २ शिक्षकांनी बाजूला करण्यास सांगितले. हे गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते अन् ते खराब झाले होते. त्यामुळे गेट बाजूला करतांना ते स्वरूपच्या अंगावर पडले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाल्यावर प्रशासनाने तात्काळ हालचाल करत शाळेतील २ शिक्षकांच्या विरोधात तक्रार दिल्यावर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शाळेमध्ये लहान मुले असतात, तर खराब गेट दुरुस्त का करून घेतले नाही ? याला उत्तरदायी असणार्यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)