अतिक्रमण पाडतांना मध्यप्रदेशमधील श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित

महानगरपालिकेकडून येथील बिजासनमाता मंदिराजवळील घरे आणि दुकाने यांचे अतिक्रमण पाडले जात असतांना श्री लक्ष्मीमातेची मूर्ती खंडित झाली. ही घटना समजताच येथे मोठ्या संख्येने नागरिक एकत्र झाले.

भिवंडी येथील श्री गणेश मंदिरात चोरी

येथील श्री गणेश मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीसह चांदी आणि तांबे यांचा ४७ सहस्त्र रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना घडली.

देवस्थान इनाम गायरान भूमी शेतकर्‍यांच्या नावे करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री

देवस्थान इनाम वर्ग ३, गायरान, बेनामी, आकारी-पड वरकस भूमी ही कसणार्‍यांच्या नावे म्हणजे शेतकर्‍यांच्या नावे करण्याविषयी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल एप्रिल २०१८…..

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

ऐतिहासिक नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड चालू असतांनाच, आता समाजकंटकांनी देवतांच्या मूर्तींना लक्ष्य करणे चालू केले आहे. खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात …….

मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्यात कर्नाटक सरकार अयशस्वी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकारने ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम’ हा कायदा लागू करून हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेतल्या; परंतु सरकार या भूमीचे रक्षण करण्यात संपूर्णत: अयशस्वी ठरले आहे

श्री लिंगराज मंदिरातील ‘ध्वनीचित्रिकरण निषिद्ध क्षेत्रा’त चित्रीकरण केल्याने अभिनेत्री रवीना टंडन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांनी येथील श्री लिंगराज मंदिरातील ‘ध्वनीचित्रिकरण निषिद्ध क्षेत्रा’त ४ मार्चला एका विज्ञापनाचे चित्रीकरण केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ धर्मादाय विभागाकडे सुपुर्द

कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील गुरु दत्तात्रेय बाबा बुडन स्वामी दर्गा यापुढे वक्फ बोर्डाच्या नव्हे, तर धर्मादाय विभागाच्या अधीन असेल, असे राज्य मंत्रीमंडळाने घोषित केले आहे.

‘केवळ हिंदु नाहीत; म्हणून तिरुपती देवस्थानातील ख्रिस्ती आणि मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून काढू नका !’

केवळ हिंदु नाहीत; म्हणून ख्रिस्ती आणि मुसलमान कर्मचार्‍यांना चाकरीतून काढू नका. पुढील आदेश मिळेपर्यंत ते कर्मचारी तिरुपती देवस्थानात चाकरी करू शकतील, असा आदेश हैद्राबाद उच्च न्यायालयाने तिरुमला तिरुपती देवस्थानला दिला.

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यात असलेल्या उत्तर महंमदपूर गावातील श्री कालीमाता मंदिरात धर्मांधांनी ५ मूर्तींची तोडफोड केली. याशिवाय येथील लाकडी मखराला आग लावून मंदिर पेटवून दिले.

कोल्हापूरमधील ३ मंदिरांतील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या

येथील टेंबलाई टेकडीसह जवाहरनगर आणि ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर असे एकूण ३ मंदिरांतील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी ११ फेब्रुवारीला फोडल्या