‘हिंदु चार्टर’च्या वतीने आज देहलीत ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषद !

‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

उल्हासनगर येथील श्री दुर्गामाता मंदिरात चोरी

येथील कॅम्प क्रमांक ३ मधील श्री दुर्गामाता मंदिराची खिडकी तोडून दानपेटीत असलेले ८०० रुपये, तसेच सी.सी. टीव्ही कॅमेरा चोरीला गेल्याची तक्रार मंदिराचे पुजारी शर्मा यांनी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल (जळगाव) येथे तहसीलदारांना निवेदन !

यावल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार आर्.के. पवार यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले.

पाकिस्तानच्या सिंधमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या हिंदु तरुणीचा संशयास्पद मृत्यू

पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे रहाणारी नमृता चंदानी ही हिंदु तरुणी लरकाना येथील बीबा आसिफा दंत महाविद्यालयाच्या वसतीगृहात मृतावस्थेत सापडल्याची घटना समोर आली आहे. तिच्या गळ्यामध्ये फास होता.

‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी प्रत्येक तरुण-तरुणी आणि पालक यांनी जागृत असायला हवे ! – योगिता साळवी, उपसंपादिका, दैनिक मुंबई तरुण भारत

समाजामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. आज धर्मांध तरुण विविध प्रलोभने दाखवून जवळीक करून मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत.

देशात १६ कोटी मुसलमान असतांना ते घाबरलेले का आहेत ? – संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल

देशातील १६ कोटी लोकसंख्या असणारे घाबरलेले नाहीत, तर १०० कोटी असणारे घाबरलेले आहेत. देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य आहेत आणि त्यांना अल्पसंख्य असण्याचे लाभही मिळत नाहीत. काश्मीरमधून ते परागंदा झाले आहेत. . . .

तमिळनाडूमध्ये मंदिरांच्या १० सहस्र कोटी रुपये मूल्याच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण

तमिळनाडूमध्येच नव्हे, तर देशातील प्रत्येक राज्यात मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. याला भ्रष्ट राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वार्थी लोक उत्तरदायी आहेत. मंदिरांची भूमी लुटू शकणारे देशाचा किती पैसा लुटत असतील, हे लक्षात येते !

मोहरमच्या मिरवणुकीच्या मार्गावरील अतिक्रमण हटवले

हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकीच्या वेळी पोलीस आणि महापालिका यांनी एवढ्या तत्परतेने अतिक्रमणे हटवली आहेत, असे कधी ऐकले आहे का ? उलट हिंदूंच्या मिरवणुकींचे मोहल्ल्यावरून जाणारे मार्ग पालटले जातात !

त्रिपुरामध्ये रहात आहेत मिझोराममधील ख्रिस्ती आतंकवादामुळे विस्थापित झालेले ४० सहस्र हिंदू !

केवळ जिहादीच नव्हे, तर ख्रिस्त्यांच्या आतंकवादी संघटनांमुळे हिंदूंना विस्थापित व्हावे लागले आहे, हे देशातील हिंदूंनी लक्षात घ्यावे ! ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सांगून हिंदूंना हिणवणारे ‘ख्रिस्ती आतंकवादा’विषयी का बोलत नाहीत ?

मिझोराममधील ख्रिस्ती आतंकवादामुळे झालेले ४० सहस्र हिंंदूंचे पलायन जाणा !

गेल्या २२ वर्षांपासून मिझोराम येथील ‘ब्रू जमाती’चे ४० सहस्र हिंदू तेथील ख्रिस्ती आतंकवादी संघटनेच्या आतंकवादामुळे त्रिपुरा राज्यात विस्थापित म्हणून शरणार्थी केंद्रात रहात आहेत.


Multi Language |Offline reading | PDF