जुन्नर – येथील विधानसभा मतदारसंघातील २ अपक्ष उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा निवडणूक खर्च सादर केला नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातील एकूण ११ उमेदवारांपैकी ९ जणांची तिसरी खर्च पडताळणी पार पडली. खर्च पडताळणी प्रक्रियेच्या संदर्भात एका उमेदवारांच्या खर्चात फरक आढळून आल्याने त्यांना नोटीस दिली आहे. शरद शिवाजी सोनवणे (अपक्ष) आणि शरद बाबासाहेब सोनवणे (अपक्ष) या २ उमेदवारांनी खर्चाचा हिशोब न दिल्याने, तसेच खर्च पथकाकडून पाठवलेल्या आधीच्या दोन्ही नोटिसांना प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकाअसे उमेदवार निवडून आल्यावर ते कसा कारभार करतील, हे लक्षात येते ! |