नोकरी घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्ध तक्रार

सावर्डेचे भाजपचे आमदार गणेश गावकर यांच्यावर सरकारी नोकरीचे आमीष दाखवून फसवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

मालवण येथे अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील ‘हायस्पीड ट्रॉलर’ला २५ लाख रुपयांचा दंड

तारकर्ली येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील अतीजलद यांत्रिक नौकेवर (हायस्पीड ट्रॉलरवर) कारवाई करून नौकेच्या मालकाकडून २५ लाख ८७ सहस्र ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती येथील मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली !

अर्ज ऑनलाईन  पद्धतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत.

परगावी जा; परंतु २० नोव्हेंबरला आपल्या गावी जाऊन मतदान करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग ! 

तुळशीविवाहाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष रूपातील पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया.

मतदानासाठी सुटी, सवलत न दिल्यास कारवाई ! – डॉ. सुहास दिवसे, पुणे जिल्हाधिकारी

मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या घंट्यांमध्ये सवलत देण्यात येते; मात्र काही आस्थापने, संस्था भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे.

आळंदी (पुणे) येथे १६ नोव्हेंबरपासून योगशिक्षक संमेलनाचे आयोजन !

‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे चौथे योगशिक्षक संमेलन येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी आळंदी देवाची येथे होणार आहे.

निवडणूक विशेष

विधानसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाने एस्.टी. प्राधिकरणाकडे ९ सहस्र २३२ बसगाड्यांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने एस्.टी.ने ती प्रक्रिया चालू केली आहे. यात पोलीस प्रशासनाकडून मागवलेल्या ४९० बसगाड्यांचाही समावेश आहे.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणेकरांना मतदानदिनी विविध आकर्षक सवलती !

जनतेने मतदान करावे, यासाठी सवलती द्याव्या लागणे, हे व्यवस्थेसाठी अशोभनीय !