‘मनुस्मृति’च्या सत्याची विस्मृती !

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री सरमा

अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !

केंद्रशासनाकडून ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ची स्थापना

योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दायित्व !
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव ‘सत्यप्रेम की कथा’ असे केले !

हिंदूंच्या संघटितपणाचा विजय ! हिंदू आता जागृत होऊन देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत, हे अभिनंदनीय आहे. अशा प्रकारे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्यास कुणीही हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान करू धजावणार नाही !

चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

मादागास्करच्या राजधानीत उभारण्यात आलेल्या भव्य हिंदु मंदिराचे उद्घाटन !  

२ कोटी ६० लाख लोकसंख्या असणार्‍या या देशाच्या राजधानीतील हे पहिले हिंदु मंदिर आहे.

इस्लामी विचारसरणी इतरांवर वर्चस्व गाजवण्यावर विश्‍वास ठेवते ! – गीर्ट विल्डर्स, खासदार, नेदरलँड्स

इस्लामला तुमच्याविषयी आदर नाही. इस्लामी विचारसरणी एकत्रित नांदण्यावर विश्‍वास ठेवत नाही; उलट एखाद्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याला अधीन ठेवणे यांवर विश्‍वास ठेवते. हिंदूंनो, हे सत्य मान्य करा आणि तुमचे स्वातंत्र्य आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करा !

‘होय हिंदूच’ संघटनेकडून ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ !

सिंहगडावर येणार्‍या काही पर्यटकांकडून गडावर मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार झाल्याने गडाचे पावित्र्य भंग होते. अशा अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी ‘होय हिंदूच’ संघटनेकडून २४ जुलै या दिवशी ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ राबवण्यात आली.

हिंदूंमध्ये झालेली जागृती जाणा !

नवी देहली येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्‍या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी दिली.