‘होळी आणि रंगपंचमी या सणांच्या वेळी गाड्या अडवून बलपूर्वक पैसे मागणे थांबले पाहिजे’, अशी मागणी करावी लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘कोकणामध्ये होळी आणि रंगपंचमी हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या उत्सवांचे विशेष आकर्षण असते; मात्र बर्‍याच ठिकाणी या उत्सवात अपप्रकार होतांना दिसतात.

वाघाच्या अवयवांची तस्करी करणारे अटकेत !

वाघाच्या अवयवांची तस्करी करणार्‍या चार जणांना नागपूर वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघाचे अवयव वापरले जात असल्याची माहिती समोर आली

डोंबिवलीजवळ रेल्वे रुळाला तडा, सीएस्एम्टीकडे येणारी वाहतूक टप्प

सकाळी ८ च्या सुमारास कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मुंबईकडे येणार्‍या सर्व लोकलगाड्या डोंबिवलीतच थांबवण्यात आल्या.

आरोग्य सर्वेक्षणासाठी आल्याचे खोटे सांगून महागडी आयुर्वेदीय औषधे विकणार्‍यांपासून सावध रहा !

दैनिक सनातन प्रभातचे वाचक, सनातन संस्थेचे साधक आणि हितचिंतक यांना सूचना

समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मारहाण

गोशाळा चालवण्याच्या पद्धतीवरून झालेल्या मतभेदातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे आणि त्यांच्यासह असलेले ३ कार्यकर्ते यांना सासवड येथे मारहाण करण्यात आली.

नागपूर येथे शाळा बंद ठेवण्याचा आदेश न पाळणार्‍या शाळांवर होणार कारवाई !

शहरातील वाढत असलेले तापमान पहाता शालेय विद्यार्थी उष्माघाताने बळी पडू नयेत यासाठी दुपारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.

कोणताही राजकीय पक्ष देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकेल, अशी आशा वाटत नाही ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसुधारक

अण्णा हजारे म्हणाले… संसदेमध्ये ज्यांना पाठवले आहे, ते लोक चारित्र्यवान असायला हवेत. पवित्र मंदिरात अपवित्र लोक गेले, तर देशाचे काय होईल ? मागील ७२ वर्षांमध्ये राजकीय पक्षांनी देशाची काय दूरवस्था केली, ते आपण पहात आहोत.

शिवसेनेमुळे मंदिर पडल्याचा अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी रोखला

शिवसेनेमुळे पावणे येथील अनधिकृत बावखळेश्‍वर मंदिर पडल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने चालवलेला अपप्रचार जागरूक शिवसैनिकांनी २७ एप्रिल या दिवशी हाणून पाडला.

आधुनिक वैद्यांनी सुस्पष्ट अक्षरात औषधाचे ‘जेनेरिक’ नाव लिहून देणे बंधनकारक !

‘प्रत्येक वैद्य त्याची वैद्यकीय क्षेत्रात सेवा चालू करण्याआधी शपथपूर्वक वचन देतो की, ‘मानवतेच्या सेवेसाठी मी माझे जीवन अर्पण करतो.’ असे असूनही व्यवसाय चालू केल्यावर ‘अधिक धन मिळवण्याच्या हव्यासामुळे काही जण अवैध मार्गांचा अवलंब करतात’, असे दिसून येते.

निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मतदान

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, नगर, मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या १४ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now