पोलिसांनी लहान स्फोट घडवून खोका केला उद्ध्वस्त
लंडन (ब्रिटन) – येथील नाईन एल्म्स परिसरात असणार्या अमेरिकेच्या दूतावासाजवळ संशयास्पद खोका सापडल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मेट्रोपॉलिटन पोलिसांनी या खोक्याचा नियंत्रित स्फोट घडवून आणला. या घटनेनंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयास्पद खोक्यात उपकरण असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. अमेरिकी दूतावासाने तातडीने कारवाई केल्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आणि परिस्थिती सामान्य झाली असल्याचे सांगितले.