गोवा : देवीची मूर्ती स्थापन करणार्‍या दोघांना अटकपूर्व जामीन संमत

वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.

नागपूरच्‍या पूरस्‍थितीला उत्तरदायी कोण ?

‘निसर्गाचा कोप म्‍हणायचा ? कि नियोजनशून्‍यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्‍यानंतरच पावसाळ्‍यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

ठाणे महापालिकेच्‍या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती होऊ देणारे प्रशासकीय अधिकारी शिक्षेस पात्र !

भांडुपमधील ६४ बांधकामे हटवली !

भांडुप येथील भट्टीपाडा चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ६४ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने हटवली आहेत. ४० वर्षे जुनी बांधकामे हटवल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिमाचल प्रदेशातील अनी येथील ५ हून अधिक इमारती कोसळल्या !

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना

पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.

अतिक्रमण हटवण्याच्या रेल्वे विभागाच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आणली स्थगिती !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या जवळ केले होते अतिक्रमण  

(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी

नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या  कारवाईवरून वक्तव्य !

गोवा : कळंगुट येथे आग लागून ७० झोपड्या खाक

आगीसारखी घटना घडल्यास साहाय्य करता येणार नाही, अशा प्रकारे झोपड्या बांधेपर्यंत प्रशासन काय करत होते ?

महाबळेश्‍वर, पाचगणी आणि कास येथे अनधिकृत बांधकामे नकोत ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कुठेही अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, यासाठी प्रशासनाला सूचना का द्याव्‍या लागतात ?