आज पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

सर्व राष्ट्रभक्त हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे !

सातारा नगरपालिकेकडून ५ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा !

एवढी थकबाकी का रहाते ? प्रत्येक वर्षी वसुली पूर्ण होण्याचे ध्येय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे !

Prayagraj Kumbh Parva 2025 : मिरजमधून महाकुंभसाठी ३ विशेष रेल्वे गाड्या धावणार !

कुंभमेळ्याला जाणार्‍या भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

अहिल्यानगरमध्ये ‘श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट’द्वारे प्रथमच संत मीराबाई चरित्र कथा सोहळा !

‘संत मीराबाईंच्या जीवनचरित्राचे गुणगान पूज्य श्री राधाकृष्णजी महाराजांच्या अमृतवाणीमधून ऐकण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना लाभणार आहे. भाविकांनी विशेषतः युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे’, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra Mandir Mahasangh : सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करा !

‘विद्येच्या मंदिरा’मध्ये (शाळेत) ड्रोसकोड (गणवेश) चालतो, ‘न्यायाच्या (न्यायालय) मंदिरा’त ड्रेसकोड (गणवेश) चालतो, तसेच ‘लोकशाहीच्या मंदिरा’तही (विधान भवन) येथे ड्रेसकोड चालतो, तर मग केवळ मंदिरातील ड्रेसकोडवर आक्षेप का ?

Yunus Appeals To Bangladeshi Hindus : (म्हणे) ‘सर्व हिंदूंना देशाचा विकास आणि प्रगती यांसाठी स्वतःला समर्पित करावे !’

देशाचा विकास आणि प्रगती यांसाठी मुसलमान काय करत आहेत, हे युनूस सांगू शकतील का ? सध्या बांगलादेशाची स्थिती पहाता देशाला बुडवण्याचेच काम ते करत आहेत, असेच चित्र आहे !

Guidelines For Devotees : मौनी अमावस्येच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून भाविकांना घाटांवर न थांबण्याची सूचना !

मौनी अमावास्येच्या दिवशी कुंभमेळ्यात अमृतस्नानाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ३ फेब्रुवारी असलेल्या अमृतस्नानाच्या दृष्टीने प्रशासनाकडून सावधगिरीची पावले उचलण्यात येत आहेत. स्नानासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी त्रिवेणी संगमाऐवजी घाटांवर स्नान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

Prayagraj Kumbh Parva 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी न्यास घराघरांत चालू करणार महासंवाद !

महाकुंभाच्या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासाच्या आवाहनावर देशातून आलेले भाविक हे मंदिर बनवण्यासाठी आतुर झालेले आहेत.

श्री मंगलमूर्तीच्‍या माघी रथयात्रेला श्री मंगलमूर्ती वाडा येथून मोठ्या भक्‍तीमय वातावरणात प्रारंभ

चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्‍त श्रीमंगलमूर्तींच्‍या पारंपरिक माघी रथयात्रेला श्री मंगलमूर्ती वाडा येथून मोठ्या भक्‍तीमय वातावरणात आणि उत्‍साहात प्रारंभ झाला.

आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून धर्मप्रसार करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्र हे काही सहस्रो वर्षे टिकेल; परंतु ग्रंथांतील ज्ञान अनंत काळ टिकणारे असल्याने जसे हिंदु राष्ट्र लवकर येणे आवश्यक आहे, तितकीच घाई भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी हे ग्रंथ प्रकाशित करण्याचीही आहे.