पेडणे भागात ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू ! – भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी
सरकारने पेडणे येथे ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडणे येथील जनता सज्ज झाली आहे. ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात मी जनतेसमवेत रहाणार आहे, अशी चेतावणी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे.