संस्कार आणि शिक्षा आवश्यक !

कुठेही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास त्यामध्ये पुढाकार घेऊन संबंधित मुलाला कठोर शिक्षा कशी होईल, हे पहायला हवे. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी संस्कार आणि शिक्षा दोन्ही आवश्यक आहे.

देवतांचे विडंबन थांबवा !

हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे.

अन्नदात्या शेतकर्‍यांचा आक्रोश !

सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टी अन् महापूर यांमुळे अन्नदाता शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे कि मानवनिर्मित याचेही संशोधन झाले पाहिजे. मानवी चुका, ढिसाळ नियोजन यांमुळे राष्ट्रीय संपत्तीचीही प्रचंड हानी होते…..

ही स्थिती कधी पालटणार ?

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही जनतेला पायाभूत सुविधा न मिळणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

खाद्यपदार्थांमधील भेसळ कोण थांबवणार ?

‘सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा !

श्री गणेशोत्सवातील मिरवणुका आदर्श कशा होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.