बोईसर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाके विक्रेत्यांचे प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फटाके विक्रेत्यांना निवेदन देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले, चिनी बनावटीचे आणि लहान बालके, मोठ्या आवाजाचे फटाके विक्रीसाठी न ठेवण्याचे आवाहन या वेळी विक्रेत्यांना करण्यात आले.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची वेष्टने असणारे आणि चिनी फटाके यांच्या विक्रीवर निर्बंध आणा !

सध्या बाजारात देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके उपलब्ध होतात. श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु यांसारख्या देवतांची, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारख्या राष्ट्र्रपुरुषांची चित्रे फटाक्यांवर सरार्स छापलेली आढळतात.