अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी मदरशाच्या शिक्षकाला ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
केरळच्या पेरुंबवूर येथील मदरसा शिक्षक अलियार याला ११ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ‘पॉक्सो’ न्यायालयाने दोषी ठरवले. अलियारला एकूण ६७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.