धुळवडीच्या पार्श्वभूमीवर २७२ जणांवर पोलिसांची कारवाई !
पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.
पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे खटले पुढील काही दिवसांत न्यायालयात पाठवले जाणार आहेत.
समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेतून युवकांची होणारी हानी भरून न येणारी आहे. याविषयी संघटित शक्ती निर्माण करून व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम शासन आणि समाज यांना पटवून दिले पाहिजेत, असे आवाहन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले.
हुडकेश्वर येथे दहावीत शिकणार्या मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अल्पवयीन मुलगा आणि त्याची आई यांना कह्यात घेतले आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
राज्याचे आर्थिक धोरण जर मद्यपींच्या करावर आधारित असेल, तर ते राज्य कदाचित श्रीमंत होईल; परंतु सुखी होणार नाही. राज्यामध्ये बहुतांश मद्याची दुकाने ही नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीच आहेत. रामराज्याची स्वप्ने दाखवून राक्षसी वृत्तीचे कर्म करणार असाल, तर जनता कदाचित क्षमा करणार नाही
एका मद्याच्या बाटलीसाठी उपाहारगृहातील एका नोकराचा खून करण्यात आला आहे. शैलेश राऊत (वय २६, रा. बेनीखुर्द, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांचा समाजातील दरारा नष्ट झाल्यानेच अशा घटना घडत आहेत. याला पोलिसांचा भ्रष्टाचार, उद्दामपणा आणि गमावलेला विश्वास कारणीभूत आहे !
पैसे मिळवण्यासाठी जनतेला दारूडे बनवणारे लोकप्रतिनिधी ! अशांवर आणि अशांच्या पक्षावर निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घातली पाहिजे आणि अशा जनताद्रोही लोकप्रतिधींना कारागृहातच डांबले पाहिजे !
धर्मप्रेमींच्या गावातील एका धर्मप्रेमीने ‘नशामुक्ती संघटना’ स्थापन केली आणि धर्मशिक्षणवर्गात येणार्या धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले. धर्मप्रेमींनी त्या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्याला परिसरातील मद्य पिणार्यांचा प्रतिसाद मिळू लागला आणि त्यामुळे काही मद्य पिणारे व्यसनमुक्त झाले.
अशा पोलिसांवर निलंबनाऐवजी बडतर्फीची कठोर कारवाई करायला हवी !