मुंबई, ठाणे आणि रायगड येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत !

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्‍ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्‍थितीची चेतावणी) दिला आहे.

Flood In UP : उत्तरप्रदेशातील ८०० गावांत पूर !

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे !

कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदवली गेली असून तिची वाटचाल आता ३९ फूट या इशारा (पाणी अधिक वाढल्याचे संकेत) पातळीकडे चालू आहे.

पुणे शहरातील अशास्त्रीय सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे ‘पुणे जलमय’ होत असल्याचे भूगोल अभ्यासकांचे म्हणणे

महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली सिद्ध केलेले अशास्त्रीय रस्ते, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळांमध्ये बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणार्‍या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन हे पुणे शहर ‘जलमय’ होण्यास कारणीभूत ठरत आहेत.

महापूर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करू !

कृष्णा खोर्‍यातील महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्‍यामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी दिले.

Heavy Rains lash Kerala : केरळला मुसळधार पावसाने झोडपले !

केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाची पंचगंगा नदीच्या घाटावर अग्नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्यक्षिके !

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली.

दुबईमध्ये आलेला पूर : निसर्गाची आणखी एक चेतावणी !

आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.

Floods in Mecca and Medina: मुसलमानांसाठी पवित्र मक्का आणि मदिना शहरांत पूर !

हवामान पालटांमुळे वाळवंटाचा देश म्हणून समजल्या जाणार्‍या सौदी अरेबियात सर्वत्र पुरामुळे हाहा:कार माजला आहे. सौदी अरेबियात गेले ७ दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने येथील नद्यांना पूर आल्याचे सांगण्यात येत आहे.