पाकिस्तानी वंशाचे अमेरिकी उद्योगपती साजिद तरार यांचे विधान
वॉशिंग्टन (अमेरिका) – येथे आयोजित ‘ग्लोबल इक्विटी अलायन्स समिट’मध्ये पाकिस्तानी उद्योगपती साजिद तरार यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. ‘पाकिस्तानातही मोदी यांच्यासारख्या राष्ट्रवादी नेत्याची आवश्यकता आहे’, असे ते म्हणाले. या संमेलनाचे आयोजन वॉशिंग्टन डव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने नव्याने प्रारंभ झालेल्या ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन इंडियन मायनॉरिटीज’द्वारे करण्यात आले होते.
साजिद तरार पुढे म्हणाले की, मी या संस्थेला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे; कारण ते अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. अल्पसंख्यांक म्हणजे हिंदु, मुसलमान, शीख, ख्रिस्ती आदी. इथे खूप भारतीय नेतृत्व आहे. भारत जगातील ५ वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. एवढेच नाही, तर तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनेही त्याची वाटचाल वेगाने होत आहे. ही यशोगाथा ऐकण्यासाठी मी येथे आलो आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानमध्ये मोदी यांच्यासारखे नेते का जन्माला येत नाहीत, याचा अभ्यास तरार करतील का ? |