श्रीरामाचे नाव असलेले तोकडे कपडे घालून स्वत:चे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर केले प्रसारित

वाणी कपूर यांनी अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचे नाव असलेले तोकडे कपडे घालण्याचे धाडस केले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळे कोणीही उठतो आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करतो. वाणी कपूर यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून निषेध व्यक्त केल्यास त्यातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना एक धडा मिळेल !

अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ अधिवक्त्यांनी केली तक्रार !

हिंदुद्वेष्टे अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेविषयी हीन स्तरावर केलेल्या वक्तव्याचे प्रकरण कर्नाटकचे अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ अधिवक्त्यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी रामलीलेची तुलना ‘चाइल्ड पॉर्न’शी (मुलांशी संदर्भातील अश्‍लील व्हिडिओशी) केली होती.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची वेष्टने असणारे आणि चिनी फटाके यांच्या विक्रीवर निर्बंध आणा !

सध्या बाजारात देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके उपलब्ध होतात. श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु यांसारख्या देवतांची, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारख्या राष्ट्र्रपुरुषांची चित्रे फटाक्यांवर सरार्स छापलेली आढळतात.