अभिनेते अरुण गोविल यांना श्रीरामाच्या वेशभूषेत स्टुडियोमध्ये परेड करण्याचा बीबीसीचा प्रस्ताव निर्माते रामानंद सागर यांनी फेटाळला होता ! – प्रेम सागर यांचा दावा

बीबीसीचा आतापर्यंतचा इतिहास हा हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे श्रीरामाच्या वेशभूषेतील कलाकाराला अशा प्रकारे परेड करायला लावून बीबीसीला हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवायची होती. अशा मोठ्या विदेशी वाहिन्याच्या दबावाला बळी न पडणारे रामानंद सागर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !

दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार

दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.