राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.

Prakash Ambedkar : संविधान पालटण्यासाठीच भाजपला ४०० हून अधिक जागा हव्या आहेत ! – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

संविधानात नवीन शब्द घुसडून काँग्रेसने यापूर्वीच पालट केला आहे. जर त्यात नवीन शब्द घुसडली जाऊ शकतात, तर ती काढण्याचा पालट व्हायला काय अडचण आहे ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर काम करेल ! –  प्रा. सुरेशनाना जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ १५ ते १७ मार्च या कालावधीमध्ये नागपूर येथे झाली. त्यांना सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत आणि सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Ehsan Ahmed Ghar Wapsi : प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.

Dattatreya Hosabale RSS:दत्तात्रेय होसबाळे यांनी पुन्हा रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी निवड !

संघामध्ये प्रत्येक ३ वर्षांनी जिल्हा संघचालक, विभाग संघचालक, प्रांत संघचालक, क्षेत्र संघचालक, तसेच सरकार्यवाह यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया केली जाते.

सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत ! – मनमोहन वैद्य, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे.

हिंदु सुसंघटित होण्यासाठीचे कार्य ‘सेवा भारती’च्या वतीने ! – शैलेंद्र बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

महाराष्ट्रात १ सहस्र ८०० हून अधिक ठिकाणी, तर देशभरात १ लाखांहून अधिक सेवा-कार्य हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत केले जाते. यात शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, कुटुंब प्रबोधन, बचत गट अशा विभागांत ‘सेवा भारती’च्या वतीने कार्य केले जाते.

Mohammad Gaus Arrested : रा.स्व. संघाचे नेते रुद्रेश यांच्या हत्येतील आरोपी महंमद घौस याला दक्षिण आफ्रिकेत अटक !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या प्रयत्नांमुळे त्याला अटक करण्यात आली.

रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५ फेब्रुवारीला पुणे येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतीय बैठकीत प्रांत संघचालकपदी नगर येथील नानासाहेब अण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली.

भिंड (मध्यप्रदेश) येथील संघाच्या कार्यालयात सापडला बाँब !

हनुमान बाजारिया या निवासी भागात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात २४ फेब्रुवारीच्या रात्री पिन बाँब सापडला.