काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमानांची देशातून हकालपट्टी करावी ! – राष्ट्रप्रेमी हिंदूंची एकमुखी मागणी

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्या येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये !

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीचा कायदा केला आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री अथवा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मालाड येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवण्यात आली. याच्या अंतर्गत मालाड येथील घनश्यामदास सराफ महाविद्यालय येथे निवेदन दिले असता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे यांनी विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्याची मागणी केली.

स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराविषयी जनजागृती करावी !

प्रतिवर्षी २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट या दिवशी, तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी अन् प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो.

यावल, भुसावळ, चोपडा आणि पाळधी येथील शासकीय अधिकारी अन् शिक्षक यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयीचे निवेदन यावल येथील पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आणि नायब तहसीलदार आर्.बी. माळी यांना सादर करण्यात आले.

सातारा येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

नागपूर येथे प्रशासन, पोलीस आणि शाळा प्रशासन यांना निवेदन

प्लास्टिकच्या वापरावर बंदी असूनही १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. वापर करून झाल्यावर त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचर्‍यात, गटारात आदी ठिकाणी पडून या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना होते.

नाशिकमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अपर जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.

बकरी ईदनिमित्त होणारी गोवंशांची हत्या रोखा ! – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या दिवशी वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

अन्वेषण यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता निःपक्षपातीपणे चौकशी करावी !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणात खटला चालू करण्यास दोन्ही कुटुंबियांकडून काही ना काही कारण काढून विरोध केला जात आहे. याचसमवेत त्यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF