अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याचा आदेश

पाकमधील न्यायालयाचा आदेश : एखाद-दुसर्‍या प्रकरणात पाक न्यायालयाने असा निर्णय दिल्याने काहीही साध्य होणार नाही आणि अशा घटना थांबणार नाहीत ! भारताने अशा घटनांमध्ये थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदु मुलींना न्याय देणे अपेक्षित आहे !

‘शिकारा’ चित्रपटावर बंदी घाला !

धर्मांधांनी काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. यात ५ लक्ष हिंदु पंडित काश्मीर सोडून अन्य राज्यांत विस्थापित झाले. अशी वस्तूस्थिती असतांना विधु विनोद चोप्रा निर्मित ‘शिकारा’ चित्रपटात काश्मिरी हिंदूंनी सोसलेल्या अत्याचारांना न्याय देण्यात आलेला नाही.

जालना येथे ‘शिकारा’ चित्रपटाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची दिशाभूल करणार्‍या ‘शिकारा’ चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रहित करण्याच्या मागणीसाठी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. संतोष बनकर यांना निवेदन देण्यात आले.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची थट्टा करणार्‍या ‘शिकारा’ या चित्रपटावर बंदी घालण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासन यांना द्यावयाचे निवेदन

‘राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात सामान्य हिंदु नागरिक जागृत होत आहेत. राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमांतून अनेकजण एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र येत आहेत.

‘शिकारा’ चित्रपटाद्वारे विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले ! – हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी ३० वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.

‘शिकारा’ची शिकार !

काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या अत्याचारांना वाचा फोडणारा ‘शिकारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो पाहिल्यावर हिंदूंचा हिरमोड झाला. हिंदूंनी त्याविषयीच्या भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे अथवा चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांना प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्या आहेत.

राजपक्षेंकडून तमिळींचा हिशोब घ्या !

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे ४ दिवसांच्या भारतभेटीवर आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘श्रीलंका तमिळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करील’, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रीलंकेत तमिळी हिंदू आणि सिंहली बौद्ध यांचा संघर्ष अनेक दशके चालू आहे.

पाकिस्तानमध्ये हालअपेष्टा सोसून भारतात आल्यानंतर झालेली फरफट !

‘पाकिस्तानच्या बाऊपट्टी सियालकोट येथील शमा ही महिला २१ वर्षांपूर्वी तिचे पती कृष्णलाल, मुली चंदा आणि सुमन अन् आई सत्या यांच्यासह भारतात आली होती. जालंधर येथील भार्गव कँपमध्ये ती राहू लागली.

पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचा अमेरिकेकडून निषेध

अमेरिकेचा पोकळ निषेध ! येथेही अमेरिकेला जर खरोखरंच पाकिस्तानात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाची चिंता असती, तर त्यांनी पाकवर कठोर कारवाई केली असती !