हिंदु असल्याचे सांगून धर्मांध तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक मास लैंगिक शोषण

किराडी भागातील अन्वर याने तो हिंदु असल्याचे सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे अनेक मास लैंगिक शोषण केले आणि नंतर तिच्याशी विवाह केला; मात्र विवाहानंतर स्वतःच्या घरी नेले नाही. उलट या तरुणीकडून २ लाख रुपयेही उकळले.

महिलेकडून राखी बांधून घ्यावी आणि तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन द्यावे !

ज्या महिलेची छेड काढली होती तिच्या घरी जात राखी बांधून घ्यावी. तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन द्यावे, अशी अट मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने एका व्यक्तीला जामीन देतांना घातली.

संभाजीनगर येथे दळणवळण बंदीच्या काळात घरगुती हिंसाचारात वाढ

दळणवळण बंदीच्या कालावधीत पुरुषांना घरी थांबल्याविना कोणताही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत घरगुती हिंसाचारात वाढ होणे, महिलांवर अत्याचार होणे या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बिहारमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे भररस्त्यातून वडिलांसमोरच अपहरण

बिहारमध्ये धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे भररस्त्यातून तिच्या वडिलांसमोरच अपहरण केल्याची घटना घडली.

अमेरिकेतील रुग्णालयाबाहेर भारतीय परिचारिकेची तिच्या पतीकडून हत्या

फ्लोरिडा (अमेरिका) येथे मेरिन जॉय या एका भारतीय परिचारिकेची तिच्या पतीनेच अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केली. ती मूळची केरळची आहे. ती येथील कॉरल स्प्रिंग रुग्णालयात नोकरीला होती.

कोरोनाच्या चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेणार्‍या प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक 

महिलांचा अपलाभ घेण्याची एकही संधी न सोडणार्‍या अशा विकृतांना कठोर शासनच करायला हवे, तरच अशा घटनांना आळा बसेल ! वासनांधांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी महिलांनीही तितकेच सतर्क रहाणे आवश्यक आहे. 

धर्माधिष्ठित बंगालवरील सांस्कृतिक आक्रमणे आणि पुनरुत्थान ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा

रामनाथी, गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले.बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.

देशभरात अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घाला ! – ‘निर्भया’च्या अधिवक्त्या सीमा समृद्धी कुशवाह यांची मागणी

या मागणीचा विचार करून प्रशासनाने अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालावी, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !

नागपूर येथे युवतीवर सामूहिक अत्याचार करणार्‍या ५ जणांना अटक

मित्रासमवेत दुचाकीवरून कुही येथे जाणार्‍या युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्यात दुचाकी बंद पडली असता तेथे आलेल्या ५ जणांपैकी तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केले.

लिंगा (जिल्हा नागपूर) येथे ६ वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळला

मुली आणि महिला यांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करून त्यांची तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक !