देवस्थान कायद्यात पालट करण्याचा तूर्तास विचार नाही ! – मंत्री बाबूश मोन्सेरात
मंदिरातील अधिकारावरून मंदिरातील महाजन आणि इतर समुदायांतील व्यक्ती यांच्यामधील वादाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच गावातील शांतीही बिघडत आहे.