श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात किरणोत्सवात पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना स्पर्श !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. हे सूर्यकिरण देवीच्या चरणांपर्यंत पोचले. हे किरण देवीच्या चरणांवरून पुढे जाऊन देवीच्या बाजूला असलेल्या सिंहांपर्यंत पोचून पुढे लुप्त झाले.

श्री विठ्ठलाच्या मुखदर्शन रांगेत प्रदक्षिणा मार्गावर आता उड्डाणपूल !

मागील अनेक मोठ्या यात्रांमध्ये विठ्ठलाच्या मुखदर्शन रांगेचे योग्य नियोजन नसल्याने भाविकांची योग्य सोय ऐन यात्रा कालावधीत होत नव्हती. त्यामुळे कार्तिक यात्रेच्या निमित्ताने मुखदर्शन रांगेसाठी प्रदक्षिणा मार्गावर छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल सिद्ध ….

बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

येथील भाजपच्या मथुरापूर शाखेचे सामाजिक माध्यम संयोजक पृथ्वीराज नास्कर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह पक्षाच्या कार्यालयात सापडला. नास्कर ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते.

Congress on RSS : महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा विचार करू !

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या आणि भविष्यातही ते करण्याची लिखित स्वीकृती देणार्‍या काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा !

पुणे येथील बुधवार पेठेतील कुंटणखान्यातून ५ तरुणींची सुटका !

गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात धाड घालून ५ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमी बिश्वास, कुंटणखाना व्यवस्थापक विक्रम बिश्वास, विकास मंडोल आणि टॉनी मुल्ला यांना अटक केली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाख रुपयांची रोकड हस्तगत !

ही पकडण्यात आलेली रक्कम आणि अमली पदार्थ आहेत, न पकडण्यात आलेले किती असतील ? याचा विचारही न केलेला बरा !

मठ, मंदिर आणि धार्मिक परिसरातील पत्ते, जुगार यांसारख्या अनैतिक व्यवसायांवर कारवाई करा !

अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. असे निवेदन पोलिसांना का द्यावे लागते ?

विनापरवाना प्रचाराचा ‘एअर बलून’ लावल्याने हॉटेलमालकावर गुन्हा नोंद !

फुरसुंगी येथील लॉजच्या गच्चीवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला ‘एअर बलून’ (हवा असलेला मोठा फुगा) लावून आचारसंहिता भंग केल्याबद्दल हॉटेलमालक अक्षय पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री चालू !

दिवाळी आणि छटपूजा यांच्या कालावधीत पुष्कळ गर्दी होत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते; मात्र ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा चालू केली आहे.

महाराष्ट्रातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी ७ ते १८ नोव्हेंबरपर्यंत ‘भव्य शिवप्रेरणा यात्रा’ !

या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे. या माध्यमातून राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.