भाजपला सत्तेने पुन्हा दिली हुलकावणी !
रांची (झारखंड) – महाराष्ट्रासह झारखंड येथील विधानसभेची निवडणूक झाली. येथे सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या आघाडीला बहुमत मिळण्याची चिन्हे असून भाजपला पुन्हा एकदा सत्तेने हुलकावणी दिली आहे. ८१ जागांच्या या राज्यांत झारखंड मुक्ती मोर्चा आघाडी ५० जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ३० जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात भाजपला बहुमत मिळेल, असे दिसत असतांना नंतरच्या काळात भाजप मागे पडत गेली आणि आघाडी बहुमताकडे वाटचाल करू लागली.
वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला ३०, काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. या पक्षांची युती सरकारवर आली होती.
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये पुन्हा आघाडीचे सरकार येणे म्हणजे घुसखोर मुसलमानांना मोकळे रान मिळणार, हे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी घातक असून यासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक आहे ! |