पुणे येथे देवेंद्र फडणविसांकडून अप्रसन्न मंडळींची मनधरणी !

भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार संजय काकडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी आमदार जगदीश मुळीक या सर्व इच्छुक मंडळींची प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट घेतली.

पुण्यातील कल्याणीनगर येथील पबच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद !

पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेचे उल्लंघन केल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकार्‍यांशी पबमालक आणि व्यवस्थापक यांनी वादावादी केली. त्यामुळे कल्याणीनगर परिसरातील ‘बॉलर पब’च्या मालकासह व्यवस्थापकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

स्थिर सर्वेक्षण पथकाकडून १५ लाख ६१ सहस्र रुपये जप्त !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये-बावडा पडताळणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने ३१ ऑक्टोबर या दिवशी २ सहस्र ५३३ वाहनांची पडताळणी केली. यातील एम्.एच्. ४६ बी.एम्. ४२९७ मध्ये १५ लाख ६१ सहस्र ८५७ रुपये इतकी रक्कम आढळून आली.

रत्नागिरी जिल्ह्यात ७१ वानरांना पकडले : दिवाळीनंतर उर्वरित वानर पकडणार

वानरांच्या त्रासामुळे कोकणामध्ये कडधान्ये, तृणधान्ये, पालेभाज्या, फळबागा करणे नागरिकांनी सोडून दिले आहे. वानरांच्या त्रासामुळे कोकणातील शेकडो एकर भूमी ओसाड पडल्या आहेत. त्यामुळे वानरांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी मागील …

मुंबई येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली लोहगडाची प्रतिकृती ! 

दिवाळीनिमित्त कलिना येथील ‘इंडियन एअरलाईन्स आयडियल’ या शाळेतील कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लोहगडाची प्रतिकृती बनवली आहे.

संत वासुदेव महाराजांचे श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र आळंदीपर्यंत पायी दिंडी !

येथील संत वासुदेव महाराजांच्या श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र आळंदी देवाच्या पायी दिंडीचे आयोजन केले आहे. या दिंडीचे आयोजन ४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत केले आहे.

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महाराष्ट्र पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची ग्वाही !

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी महिलांच्या रक्षणाची ग्वाही दिली आहे. ‘महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या रक्षणाची ओवाळणी-महाराष्ट्र पोलिसांकडून सिद्ध आहे’, अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून…

‘गोरक्षण सेवा समिती, निपाणी’ने कत्तलीसाठी नेण्यात येणारे ५२ गोवंश वाचवले !

गोवंश हत्याबंदी कायदा संमत झाला असूनही अद्यापही गोवंशाची तस्करी होत आहे. कायदा आणि पोलीस यांना न जुमानणार्‍या धर्मांधांना वठणीवर कसे आणणार ?

लोय पिंपळोद (नंदुरबार) येथे चारचाकीने ५ जणांचा चिरडले; १ गंभीर

तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरो गाडीने रस्त्याच्या कडेला ३ मोटारसायकलसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडल्याने ५ जणांचा मृत्यू, तर १ जण गंभीर घायाळ झाल्याची घटना घडली.

लॉरेन्स बिष्णोईच्या भावाचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्याविषयी प्रक्रिया चालू

सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई अमेरिकेत लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.