अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केले ठाणे पोलिसांच्या स्वाधीन !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.

गुरांची अवैधपणे होणारी हत्या आणि ‘धिरयो’ रोखण्यासंबंधी मडगाव येथे दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन !

अवैधरित्या करण्यात येणारी गुरांची हत्या आणि आयोजित केल्या जाणार्‍या धिरयो (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) यातून मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एक सत्र आयोजित केले होते.

गोहत्या प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका गोहत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, ‘आम्हाला ठाऊक आहे की, जेव्हा एखाद्या देशाची श्रद्धा आणि संस्कृती यांना धक्का पोहोचतो, तेव्हा देश दुर्बल होतो.’

पेठ वडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांची हत्या केल्याच्या प्रकरणी ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांना निवेदन देण्याची वेळ का येते ? बेपारी गल्ली येथे गोहत्या होत आहे हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ?, कि पोलिसांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

नगर येथे ४ सहस्र गोवंशियांची कातडी जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गायी, बैल आणि वासरे यांची हत्या होणे दुर्दैवी आहे ! कायदा आणि पोलीस प्रशासन यांवरील सामान्य माणसाचा विश्वास उडवणार्‍या या गोहत्या बंद होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदा असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाची वाहतूक होतेच कशी ? ‘कसायांना कायद्याची भीती नाही कि पोलिसांकडून कायद्याची प्रामाणिकपणे कार्यवाही होत नाही ?’ याचा शोध राज्यातील भाजप सरकारने घेतला पाहिजे !

नगर येथील मोठ्या अवैध पशूवधगृहातून २५० जनावरांची प्रतिदिन कत्तल !

जिल्ह्यातून मुंबईसह कर्नाटकात प्रतिदिन पाठवले जाते ८० सहस्र किलो मांस

गोविरोधी विधान करणारे मेघालयचे भाजपचे पशूसंवर्धनमंत्री सानबोर शुलाई यांना मंत्रीमंडळातून काढून टाका ! – ‘गोवंश रक्षा अभियान’ची मागणी

काँग्रेसपेक्षाही भाजपकडून गोवंशियांच्या हत्येला अधिक पाठिंबा लाभणे दुर्दैवी ! – अमृतसिंह, प्राणीप्रेमी

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

मेघालयातील भाजप शासनातील पशूसंवर्धन मंत्री सानबोर शुलाई यांचे गोविरोधी विधान !