गोमांसाचे सूप पितांनाचे छायाचित्र ‘फेसबूक’द्वारे प्रसारित करणार्‍या धर्मांधाला जमावाकडून मारहाण

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचाच हा प्रयत्न होता. त्यामुळेच जमावाचा उद्रेक झाला, हे लक्षात घेतले पाहिजे ! धार्मिक पुस्तकाची पाने फाडल्याची किंवा ती जाळल्याची केवळ अफवा पसरली, तरी धर्मांधांकडून देशभरात दंगली घडवल्या जातात, तरीही त्यांना कोणी असहिष्णु म्हणत नाही !

गोमांस खाण्यापासून रोखून दाखवण्याविषयी संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

देशात गोहत्या आणि गोमांस यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असतांना अशा प्रकारचे आव्हान देणार्‍यांच्या विरोधात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का बोलत नाहीत ? अशांतून जमावाचा उद्रेक होऊन एखादी अयोग्य घटना घडली, तर त्याला उत्तरदायी कोण रहाणार ?

अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ने क्षमा मागण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

खाद्यपदार्थांमधील घटक हे गोमांस आणि डुकराचे मांस यांपासून बनवल्याचा संशय : अमेरिकेतील हिंदू तेथील पदार्थांमधील घटकांविषयी जितके सतर्क आहेत, तितके भारतातील हिंदू नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद ! धार्मिक भावनांविषयी सतर्क असणार्‍या अमेरिकेतील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही बोध घेतील का ?

गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद

गोवंशियांचे मांस आणि तुकडे टेम्पोमधून घेऊन जाणारे धर्मांध चालक मोबीन आणि धाराशिव येथील मुख्तार कुरेशी या दोघांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी घोंगडे वस्ती येथील रवि मंदकल यांनी तक्रार दिली होती.

लोकांच्या विरोधामुळे कोलकाता येथील ‘बीफ फेस्टिव्हल’ रहित

कोलकाता येथे २३ जून या दिवशी होणारा ‘बीफ फेस्टिव्हल’ विरोध झाल्याने रहित करण्यात आला. अनेकांनी दूरभाष आणि सामाजिक प्रसार माध्यमे यांद्वारे  केलेल्या विरोधामुळे आयोजकांनी तो रहित केला.

येरवडा येथे धर्मांधाच्या कह्यातील दीड सहस्र किलो गोमांस पकडले

येथील गोमांस असलेल्या गाडीने दुचाकीला धडक दिल्यावर आरोपी जमीर गुलामनबी पिरजादे पसार झाला. वाहतूक पोलिसांनी पाठलाग केल्यावर गाडी थांबवण्यात आली. गाडीची पाहणी केल्यावर तिच्यात दीड सहस्र किलो गोमांस आढळून आले.

वडकी (पुणे) येथे ३ टन गोमांस जप्त !

येथील कसाई मोहल्ल्यात ४० गायींची हत्या करून त्यापासून सिद्ध केलेले ३ टन गोमांस सासवडमार्गे, शिवाजी मार्केट कॅम्प, भीमपुरा आणि कोंढवा येथे येणार असल्याची माहिती गोरक्षक निखिल दरेकर यांना मिळाली.

गोमांसबंदी, नद्यांची स्वच्छता अशी सूत्रे निवडणुकीच्या प्रचारात हवीत ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

भारतातून गोमांसाची निर्यात कधी बंद होणार ?, नोटाबंदीमुळे झालेली हानी कशी भरून काढणार ?, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार ? … अशी निवडणुकीच्या प्रचारासाठी महत्त्वाची सूत्रे असायला हवीत – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

गोमांस विक्रीच्या संशयावरून आसाममध्ये एकाला मारहाण करून डुकराचे मांस खायला लावले !

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार निष्क्रीय असल्यामुळे जमावाला अशा प्रकारचे कृत्य करावे लागत आहे ! सरकारने देशभरात गोमांसावर बंदी घालून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचा आदेश देऊन बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना जपल्या असत्या, तर देशात असे प्रकार घडले नसते !

गोमांस निर्यातदारांशी केवळ मुसलमानच नव्हे, तर जैन आणि अन्य धर्मीयही जोडले आहेत ! – पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचा राज ठाकरे यांचा दावा

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रफीत दाखवून हा आरोप केला आहे. याचे अजूनही भाजपने खंडण केलेले नाही अथवा स्वतःची बाजू मांडलेली नाही ! याचा अर्थ हिंदूंनी ‘हे वक्तव्य सत्य आहे’, असे समजायचे का ? 


Multi Language |Offline reading | PDF