‘नोकरी विक्री’त राजकीय लागेबांधे नाहीत !

नोकरी विक्री घोटाळा हा गेल्या १० वर्षांपासून चालू आहे. हा घोटाळा कित्येक कोटींचा आहे. आतापर्यंत राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून ३९ लोकांच्या विरोधात २९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर ३३ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.

कोकण आणि महाराष्ट्र यांच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा !

लोकसभेत महाविकास आघाडीला कोकणात एकही जागा मिळाली नाही. तीच स्थिती या निवडणुकीत असेल. कोकणसह महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित सभेत केले.

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारेच श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’

संपादकीय : चित्रपटांतील भारतीयत्व जपा !

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्माज चाईल्ड : द स्टोरी ऑफ इंडियन सिनेमाज शोमॅन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. स्वत:च्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी सुभाष घई यांनी ‘हिंदी चित्रपट भारतीयत्वापासून दूर जात आहे’, अशी खंत व्यक्त केली.

भारतमातेला विश्वगुरु बनण्याकडे घेऊन जाणे, हे सर्वांचे कर्तव्य !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात आलेल्या प्रत्येकाच्या मनात ‘हिंदु राष्ट्र’ आणि हिंदु समाजाचे उत्थान यांच्याप्रती एकप्रकारची वेदना झळकतांना दिसली. आपण सर्वांनी सर्व शक्ती एकवटून जोराने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. येणारा काळ निश्चितच आपला आहे.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची संकल्पना आणि आवश्यकता !

‘सध्या देशात हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. आज हिंदूंवर जे भयावह संकट आले आहे, तसे संकट भूतकाळातही आले नव्हते. ८०० ते १ सहस्र वर्षांपर्यंत इस्लामने आमच्यावर राज्य केले; परंतु संपूर्ण भारत वर्षावर ते कधीही राज्य करू शकले नाहीत.

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतात जिथे मिश्र आरोग्यव्यवस्था आहे, तिथे चांगल्या दर्जाची सरकारी विनामूल्य आरोग्य सेवा, ती ही तिथे येईल त्या प्रत्येकाला, कोणतेही कागदपत्र न मागता जर मिळत असेल, तर तिला ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, असे म्हणता येईल.

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

हिंदूंच्या जातीजातींमध्ये भेद करून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र जाणून ते रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे महत्त्वाचे !

राजकीय पक्षांच्या निधीचे गौडबंगाल !

जे राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी जगजाहीर करण्यास बचावात्मक भूमिका घेतात, ते देशात पारदर्शी कारभार आणू शकतील का ?

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील भागात संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.