विहिरीतून ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

विहिरीतून पाणी चोरल्याप्रकरणी काळबादेवीतील पांड्या मेन्शनचे मालक त्रिपुरादास नानताल पांड्या, त्यांचे सहकारी प्रकाश पांड्या आणि मनोज पांड्या यांवर आझाद मैदान पोलिसांनी कलम ३७९ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

खारघर येथील महेश ट्युटोरिअलच्या शिक्षकांकडून तरुणीवर अत्याचार

खारघरमधील महेश ट्युटोरिअल या खासगी शिकवणीतील दोन शिक्षकांनी एका तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात शिक्षक आरोपी दिनेश जैन आणि अनुप शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भिवंडीत ५ लाख रुपयांचा गुटखा जप्त, धर्मांधाला अटक

भिवंडी खंडूपाडा रस्त्यावरील एका गोदामामध्ये तंबाखूजन्य गुटख्याचा साठा करणार्‍या मोहम्मद खालीद अन्सार खान (३६) याला अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आक्रमण करणारा अटकेत

येथील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने आक्रमण करणारा अजिंक्य टेकाळे याला १६ ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी पकडले. पोलीस त्याच्याकडून माहिती घेत आहेत.

डोंबिवली येथील भ्रमणभाष संचाच्या दुकानात चोरी करणार्‍या धर्मांधाला अटक

डोंबिवली पश्‍चिम येथील एका भ्रमणभाष संचाच्या दुकानात चोरी करणारा मुंब्रा येथील मोहम्मद नूर हुसेन इस्माम शेख (वय २२ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या अन्य दोन सहकार्‍यांचा पोलीस शोध घेत आहेत

ठाणे न्यायालयाच्या आवारात भर दुपारी रकमेची चोरी

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात शिकाऊ अधिवक्त्याच्या हातातून १० सहस्र रुपये लांबवल्याचा प्रकार १५ ऑक्टोबर या दिवशी भर दुपारी घडला.

नालासोपारा येथे नायजेरियाच्या नागरिकांकडून वाहनांची तोडफोड, नागरिकांना मारहाण

नालासोपारा परिसरात एका नायजेरियाच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरातील अन्य नायजेरियाच्या नागरिकांनी लाठ्या-काठ्यांसह रस्त्यावर येऊन वाहनांची तोडफोड केली.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल मूर्तीजवळील अर्पणपेटीतील पैसे चोरणार्‍या पुजार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद

असे पुजारी कधीतरी देवतेची पूजा श्रद्धेने करतील का ? अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! अशा घटना होऊ नयेत, यासाठी सर्वत्रच्या मंदिरांची व्यवस्था भक्तांकडे असणे आवश्यक आहे !

मूर्तीजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात विनापरवाना ध्वनीक्षेपक वाजवल्याने गुन्हा नोंद

मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवी राठी यांनी निवडणूक प्रचारासाठी वाहनाला ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती घेतली नसल्याने वाहनचालक पंकज जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तक्रार केली.

धर्मांध ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत भंगार गोळा करणार्‍या महिलेचा मृत्यू

कचरा वाहतूक करणार्‍या पुणे महापालिकेच्या ट्रकने रस्त्यावर भंगार गोळा करणार्‍या ज्येष्ठ महिलेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.


Multi Language |Offline reading | PDF