एस्.टी.समवेत ‘तीर्थाटन योजना’ राबवण्याचे परिवहन मंत्र्यांचे खासगी ट्रॅव्हल्सना आवाहन !
एस्.टी.च्या समवेत संयुक्तपणे धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करावे, अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांना केले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अल्प व्ययात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.