हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

गोवा : यापुढे हातात राखी बांधून शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना अनुमती असेल ! – व्यवस्थापनाचा पालकांना संदेश

राख्या काढण्यास सांगणार्‍या मुख्याध्यापिकेवर विद्यालय व्यवस्थापनाने कोणती कारवाई  केली ? हेही पालकांना सांगितले पाहिजे.

‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ

कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.

कळंगुट पंचायतीला पोर्तुगालच्या फुटबॉलपटूचा पुतळा चालतो, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का चालत नाही ?

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’

गोवा : शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर कळंगुटचे सरपंच सिक्वेरा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा आदेश मागे

धर्म आणि राष्ट्र प्रेमी संघटित झाल्यास काय होऊ शकते ? याचे हे उदाहरण सर्वत्रच्या राष्ट्र-धर्मप्रेमींनी लक्षात ठेवावे !

कालीमातेचा अनादर केल्यावरून युक्रेनने भारताची मागितली क्षमा !

भारताला नेहमीच पाण्यात पहाणार्‍या युक्रेनचे खरे स्वरूप ओळखा ! सध्या रशियामुळे संकटात सापडलेल्या युक्रेनचे हे नाटक आहे, हे लक्षात घ्या !

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.

छत्रपती संभाजीनगर नामांतराचे समर्थन करा !

शासनाने जनतेला २७ मार्चपर्यंत नामांतराविषयीचे आक्षेप सरकारी कार्यालयात नोंदवायला सांगितले आहेत. हा आक्षेप नोंदवण्यातील अर्जांची संख्या २३ मार्चपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ ४५०, तर विरोधात ७० सहस्रांहून अधिक अर्ज आलेले आहेत.