(म्हणे) ‘सीएएमुळे बहुसंख्य मुसलमान निर्वासित होतील !’- संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटरेस

गुटरेस यांनी भारतातच गेल्या ३ दशकांपासून धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या हिंदूंविषयी कधी विधान केले आहे का ? भारतात घुसखोरी केलेल्यांना देशात थारा न देण्याचा भारताला अधिकार आहे. जर संयुक्त राष्ट्रांना या घुसखोरांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांना घेऊन जावे !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या स्थापना दिनानिमित्त मंगळुरूमध्ये धर्मांधांकडून विनाअनुमती संचलन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अनुमती मागूनही ती नाकारणार्‍या पोलिसांना विनाअनुमती संचलन करणार्‍या जिहादी संघटनेवर कारवाई का करता येत नाही ? राज्यातील भाजप सरकारने या संघटनेवर आणि त्याकडे बघ्याची भूमिका घेणार्‍या संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे !

भारतियांच्या राष्ट्रवादाला आव्हान देणारे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण

अल्पसंख्यांकवाद किंवा मुसलमानांसमोर विवश झालेले राजकारण आज राष्ट्रवाद्यांसमोर एक मोठे आव्हान झाले आहे. स्वतंत्र भारताची नीती ठरवणार्‍यांसमोर चांगला राष्ट्रवाद निर्माण करणे, ही संकल्पना होती; कारण त्यांच्यासमोर ‘अखंड भारतात मोगल आणि ब्रिटीश शासकांनी देशातील मूळनिवासी (भूमीपुत्र) हिंदूंचे किती शोषण केले’, याचा पुष्कळ मोठा इतिहास होता.

सरकारी योजनेच्या अंतर्गत ४ सहस्र वृद्ध हिंदूंची आयोजित केलेली तीर्थयात्रा रहित !

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या तीर्थयात्रा रहित होतात, तर हज यात्रेला अनेक वर्षे अब्जावधी रुपयांचे अनुदान मिळत राहते ! काँग्रेसची हीच ढोंगी धर्मनिरपेक्षता आहे !

‘शिकारा’ चित्रपटावर बंदी घाला !

धर्मांधांनी काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. यात ५ लक्ष हिंदु पंडित काश्मीर सोडून अन्य राज्यांत विस्थापित झाले. अशी वस्तूस्थिती असतांना विधु विनोद चोप्रा निर्मित ‘शिकारा’ चित्रपटात काश्मिरी हिंदूंनी सोसलेल्या अत्याचारांना न्याय देण्यात आलेला नाही.

जालना येथे ‘शिकारा’ चित्रपटाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची दिशाभूल करणार्‍या ‘शिकारा’ चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रहित करण्याच्या मागणीसाठी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. संतोष बनकर यांना निवेदन देण्यात आले.

मध्य प्रदेश की कांग्रेस सरकार ने ४ हजार तीर्थयात्रियों की सरकारी तीर्थयात्रा रहित की !

कांग्रेस को सरकारी पैसेवाली हज यात्रा चलती है !

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

मध्यप्रदेश सरकारकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’च्या अंतर्गत १५ फेब्रुवारीपासून वैष्णोदेवी, काशी, द्वारका आणि रामेश्‍वर येथे ५ रेल्वेगाड्यांमधून ४ सहस्र वृद्ध हिंदु यात्रेकरू तीर्थाटनाला जाणार होते; मात्र सरकारने कोणतेही कारण न देता ही यात्रा रहित केली.

पुरातत्व खाते देहलीतील औरंगजेबाच्या शीश महालाचे अडीच कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करणार

पुरातत्व खात्याला देशातील सहस्रावधी प्राचीन मंदिरे आणि धार्मिक केंद्रे यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ आणि पैसा नाही; मात्र औरंगजेबाच्या शीश महालाचे नूतनीकरणासाठी वेळ आणि पैसा आहे ? यामागे काय गूढ आहे, हे त्याने हिंदूंना सांगितले पाहिजे !

रेल्वे प्रशासनाने संस्कृत भाषेतील नावाचा फलक हटवून पुन्हा उर्दू भाषेतील फलक उभारला

रेल्वे प्रशासनाचे उर्दूप्रेम आणि संस्कृतद्वेष जाणा ! प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा संस्कृतद्वेष्ट्यांचा भरणा असल्यामुळेच संस्कृतचे संवर्धन होत नाही ! केंद्रातील भाजप सरकारने याची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करावी, ही संस्कृतप्रेमींची अपेक्षा !