अशा चित्रपटांना ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बक्षी यांनी विरोध केला आहे.

भारतमातेच्या पूजेला विरोध करणार्‍या संघटनांवर बंदी घाला !

मुसलमान संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कर्नाटकातील मंगळुरू विश्वविद्यालयात ११ ऑगस्ट या दिवशी होणारी भारतमातेची पूजा रहित करण्यात आली.

अशांना कारागृहात डांबा !

शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाऐवजी शिखांचा ध्वज ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानावरही टीका केली.

सत्य नाकारणार्‍यांना ओळखा !

‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहे. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.

किती हिंदू स्वतःच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतात ?

मलप्पूरम् (केरळ) येथे रामायणावर आधारित ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत महंमद जाबिर पीके आणि महंमद बसीथ एम्. या दोघा मुसलमान तरुणांनी यश मिळवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महंतांना धमकावणार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

उत्तरप्रदेशातील ‘बडी संगत’ संप्रदायाचे महंत बजरंग मुनी यांना भ्रमणभाषवरून मौलाना मुश्ताक खान याने ‘सिर तन से जुदा’ची धमकी दिली आहे. १ वर्षापूर्वी काही मुसलमानांनी महंतांवर शस्त्रांद्वारे आक्रमणही केले होते.

धर्मांतरविरोधी कायदा करा !

डहाणू येथे एका हिंदु महिलेच्या घरी धर्मांतराचा होणारा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने हाणून पाडला. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक केली.

संबंधितांना कारागृहात टाका ! 

प्रसिद्ध साप्ताहिक ‘द वीक’ने भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्लाघ्य चित्र प्रसिद्ध केले आहे. याविरोधात भाजपचे नेते प्रकाश शर्मा यांनी कानपूरमध्ये तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका जाणा !

उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.