अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
देहलीच्या मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये लक्की नावाच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलाची मुसलमान तरुणांकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
देहलीच्या मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये लक्की नावाच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलाची मुसलमान तरुणांकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आज प्रतिदिन ७० ते ८० सहस्र गायींची हत्या होते. गोमांस निर्यातीत भारत दुसर्या स्थानावर आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी वेळीच गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करा, असे आवाहन ज्योतिर्मठाचे सचिव पू. किशोरशास्त्री दवे यांनी केले.
गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे मागील सरकारने संमत केलेले २४६ कोटी रुपयांचे ४६ व्यावसायिक प्रकल्प रहित केले आहेत. सरकारने म्हटले की, मंदिरांच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक कार्यांसाठीच केला जाईल.
पुणे येथील फुरसुंगी भागातील ‘विबग्योर स्कूल’मध्ये इयत्ता दहावीत शिकणार्या एका हिंदु विद्यार्थिनीवर धार्मिक प्रभाव टाकून तिचे धर्मांतर करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
सोलापूर येथील ‘आयटीआय’मध्ये मुसलमान महिला अधिकार्याकडून १५० विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक अन् धार्मिक छळ झाल्याचे समोर आले आहे.
परतूर (महाराष्ट्र) शहरातील ‘किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल’च्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थी बनावट तलवारी घेऊन ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ या पाकिस्तानी इस्लामी गाण्यावर नृत्य करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
पवित्र पाणी प्यायल्याने कर्करोग, ट्यूमर अशा असाध्य व्याधी बर्या होतात, अशी बतावणी करणारा पास्टर (ख्रिस्ती धर्मप्रचारक) केनेथ पॉल सिल्वे याच्यासह ८ जणांविरुद्ध कोंढवा (पुणे) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान कोलकात्यातील ‘रेड रोड’वरील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने रस्ते बंद करण्यात येणार आहेत. ‘रस्त्यावरील नमाजपठण बंद केले. मग योगदिनाला अनुमती का ?’, असा विरोध मुसलमानांकडून होत आहे.