शी जिनपिंग यांना आयुष्यभर चीनचे राष्ट्राध्यक्ष ठेवणारा कायदा !

शी जिनपिंग यांना तीनदा आणि आयुष्यभरच चीनचे सर्वेसर्वा म्हणून रहाण्याची इच्छा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जे केले, नेमके तेच शी जिनपिंग करू इच्छित आहेत. ते स्वत:ला चीनचे युगपुरुष समजतात आणि त्यांना वाटते की, तेच चीनला महाशक्ती बनवू शकतील. ते हे करू शकतील कि नाही, हा भाग वेगळा !

पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !

गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

नक्षलवाद्यांच्या हत्येचा सूड उगवू !

नक्षलवादी संघटनांची पत्रकाद्वारे धमकी ! अशा धमक्या येऊ नयेत, यासाठी नक्षलवादच समूळ नष्ट करायला हवा !

शबरीमला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ हा प्रसाद मंदिराचे कर्मचारीच सिद्ध करतात ! – केरळ देवस्वम् मंडळाचे स्पष्टीकरण

शबरीमला मंदिराचा प्रसाद ‘अल् झहा’ या अरबी नावाने, ‘हलाल’ प्रमाणित करून मंदिर परिसरात कुठून उपलब्ध होतो ?, हा प्रश्‍न शेवटी अनुत्तरितच रहातो !

चीन करत आहे उघूर मुसलमानांच्या अवयवांचा व्यापार !

भारतात एखाद्या मुसलमानावर जमावाने आक्रमण केले, तर पेटून उठणारे मुसलमान, त्यांच्या संघटना आणि निधर्मीवादी यांविषयी काही बोलतील का ?

देशाच्या विरोधात चालू असलेल्या ‘माहिती युद्धा’ला आपण जिंकणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘सीएए’च्या समर्थनार्थ एकाही संकेतस्थळावर माहिती मिळणार नाही. या माध्यमांतून ‘माहिती युद्ध’ चालू असून तेसुद्धा आपण (हिंदूंनी) जिंकणे आवश्यक आहे.

केरळमधील कोचीन देवस्वम् मंडळाकडून चालवण्यात येणार्‍या महाविद्यालयात माकपची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून अश्‍लील फलकांचे प्रदर्शन !

या फलकांमध्ये राष्ट्रप्रेमी लोकांची हेटाळणी करण्यासह जिहाद्यांचा गौरव करण्यात आला आहे.

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.

भाविकांच्या विरोधानंतरही केरळमधील साम्यवादी माकप सरकारने कन्नूर येथील मत्तनूर महादेव मंदिर कह्यात घेतले !

प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप