‘ती’ सूची पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

कोरोनाबाधित असा अपप्रचार करून परदेशातून आलेल्या कोल्हापुरातील काही व्यक्तींची सूची सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पुढे पाठवल्यास गुन्हा नोंद केला जाईल, अशी चेतावणी डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.