महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट !
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ११ डिसेंबर या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहली येथे भेट घेतली. महाराष्ट्राच्या प्रगती आणि देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा सहभाग याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घेतल्याच राहुल नार्वेकर यांनी म्हटले.