हिंदु संघटनांच्या निदर्शनांच्या ठिकाणी तरुणीकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

देशविरोधी घोषणा देणार्‍या अमूल्याच्या विरोधात बेंगळुरू येथे निदर्शने

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारी अमूल्या लियोना हिच्या मागे मोठी संघटना कार्यरत

कर्नाटकातील भाजप सरकारने अशांची पाळेमुळे खणून काढून सर्वांना देशद्रोेहाच्या अंतर्गत कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

लवकरच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नागरिकत्व रहित होईल ! –  डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा दावा

काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व लवरकरच रहित होईल. या संदर्भातील एका धारिका (फाईल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पटलावर आहे,

राममंदिरासाठी सरकारकडून निधी घेणार नाही ! – महंत नृत्य गोपाल दास

अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्यासाठी सरकारकडून निधी घेतला जाणार नाही. जनतेच्या योगदानातून मंदिर उभारण्यात येईल. सरकारसमोर अगोदरच अनेक समस्या आहेत, ज्या मार्गी लावायच्या आहेत.

घोटाळेबहाद्दर नीरव मोदी यांच्या वस्तूंच्या होणार्‍या लिलावात हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा समावेश

स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान अन्य धर्मीय कदापि सहन करत नाहीत; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते स्वत:च्या श्रद्धास्थानांचा अवमान निमूटपणे सहन करतात. स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान वैध मार्गाने रोखणे हे हिंदूंचे धर्मकर्तव्य होय !

नास्तिकतावादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आता राजकीय लाभासाठी आस्तिक होणार !

‘कालाय तस्मै नमः ।’ असे एक संस्कृत वचन आहे. त्याचा प्रत्यय माकपच्या या पालटलेल्या धोरणावरून लक्षात येत आहे !

राज्यात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे १ सहस्र ६८० व्हिडिओ आढळले

राज्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे १ सहस्र ६८० व्हिडिओ आढळले असून आतापर्यंत विविध ठिकाणी ९६ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘देशाचे संविधान पालटण्याचा प्रयत्न !’ – तुषार गांधी यांचे फुकाचे बोल

देशाचे संविधान म्हणजे देशाचा आत्मा पालटण्याची सिद्धता चालू आहे. हे चालू असतांना आपण प्रश्‍न विचारण्याचा अधिकार गमावून बसत आहोत. एका मेणबत्तीने पालट होणार नाही, तर क्रांतीची मशाल पेटवावी लागेल, अशी मुक्ताफळे तुषार गांधी यांनी उधळली.